Take a fresh look at your lifestyle.

दसऱ्याला शस्त्रपूजन का करतात?

कधीपासून सुरू झाली परंपरा?

असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून विजयादशमी साजरी केली जाते. या दिवशी शस्त्रपूजन करण्याची परंपरा आहे. याच दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला होता तर दुर्गा मातेने महिषासूराचा वध केल्याचे सांगण्यात येते.
रावणाचा आणि महिषासूराचा अंत याच दिवशी झाल्याने असत्यावर सत्याचा विजयाचे प्रतीक म्हणून विजयादशमी साजरी केली जाते. प्राचीन काळापासून या दिवशी शस्त्रपूजन करण्याची परंपरा कायम आहे. कारण या दिवशी सुरू केलेल्या शुभ कार्यात यश मिळते, अशी मान्यता आहे.
प्राचीन काळाचा विचार केला तर या दिवसापासूनच युद्धावर जाण्याची क्षत्रियांची परंपरा होती. या महिन्यापासून पावसाळा संपून हिवाळ्याला सुरुवात होते. त्यामुळे या दिवसापासून युद्ध किंवा मोहिमांना सुरुवात करण्यात येत होती. त्यामुळे या दिवशी शस्त्रपूजनाची पंरपरा असल्याचे सांगण्यात येते.
विजयादशमीला सुरू होणाऱ्या युद्धांमध्ये विजय मिळतो, अशी मान्यता असल्याने ही परंपरा सुरू झाल्याचे बोलले जाते. याच दिवशी विद्याग्रहणासाठीही सुरुवात केली जात होती. त्यामुळे या दिवशी शुभ कार्य सुरू करण्याची परंपरा होती.