Take a fresh look at your lifestyle.

राज्यमंत्री बच्चु कडू यांची ‘सिनारे हॉस्पिटल’ला सदिच्छा भेट !

कोरोना काळातील रूग्णसेवेचे केले कौतुक.

 

 

अहमदनगर : रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा माणून कोरोनाच्या संकटकाळात डॉ.प्रशांत सिनारे यांनी केलेले रुग्णसेवेचे कार्य मानवतेच्या दृष्टीने मोलाचे असल्याचे मत शालेय शिक्षण, जलसंपदा राज्यमंत्री बच्चु कडू यांनी व्यक्त केले.
येथील सिनारे हॉस्पिटलला राज्यमंत्री कडू यांनी सदिच्छा भेट देवून वैद्यकिय सुविधांची माहिती घेतली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत सिनारे यांनी स्वागत केले. कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत सिनारे हॉस्पिटलने इतरत्र अद्यावत बेड, ऑक्सिजन,व्हेंटिलेटरचा तुटवडा असताना देखील रूग्णांना या सुविधा पुरवून जीवदान देण्याचे काम केले. त्यामुळे ग्रामिण भागातील सर्वसामान्य रुग्णांना मोठा आधार मिळाला या कामाची माहिती घेवून रात्र्यमंत्री कडू यांनी समाधान व्यक्त करीत कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टर हेच खरे कोरोना योध्दा असल्याचे सांगितले.
हॉस्पिटलचे संचालक डॉ. सिनारे यांनी येथील अत्याधुनिक व अत्यावश्यक सुविधांची माहिती दिली. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, तालुकाध्यक्ष भरत भाऊ लवांडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष जाधव, राष्ट्रीय सचिव शिरसाठ,उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तूभाऊ बोडखे, राज्य प्रवक्ते संतोष पवार, उपजिल्हाध्यक्ष पप्पूशेठ येवले प्रहार माजी सैनिक संघटना व हॉस्पिटलचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.