Take a fresh look at your lifestyle.

आम्ही दसरा सण का आणि कसा साजरा करावा?

दसरा सर्वोच्च संस्कार देणारा उत्सव !

नवरात्रीचे नऊ दिवस संपले की दहावा दसरा. हिंदू धर्म संस्कृतीत खूप महत्व असलेला दसरा सण आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच ‘दसरा’, ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात.
दसरा का साजरा करतात?
याच दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता व तेंव्हा पासून हा दिवस विजयोत्सव साजरा करण्यासाठी म्हणून विजयादशमी म्हणून म्हणजेच दसरा म्हणून साजरा केला जातो. विजयाची प्रेरणा देणारा हा सण आहे.
सज्जनहो आम्ही दसरा सण का आणि कसा साजरा करावा?दसरा सण आम्ही जीवनात काही चांगलं करण्याचा मनोदय ठेवून जगत असलो तर तो अत्यंत सात्विकतेने साजरा केला पाहिजे.असत्यावर सत्याचा विजय,दैत्यावर देवांचा विजय,क्रुरतेवर प्रेमाचा विजय याची साक्ष असणारा सण साजरा करताना पांडवांचा अज्ञातवास संपुन त्यांनी शमी वृक्षात ठेवलेली शस्त्र पुन्हा घेतली आणि कौरवांविरुद लढण्यासाठी सज्ज झाले याचं स्मरण असावं.प्रभु श्रीरामांनी याच दिवशी समस्त देवतांना डोईजड झालेला अनितीच्या आणि भ्रष्ट मार्गाने जाणाऱ्या बलाढ्य रावणाचा अंत केला याचं स्मरण आम्हाला असावं.आम्ही स्वतःला हिंदु म्हणवून घेत असु तर संस्कृती जपणे आणि तिचं पुढच्या पिढीत संक्रमन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। 

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421
विजयाची खात्री देणारा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा खास मुहूर्त. आम्ही तो कसा साजरा करावा?या दिवशी नवीन व्यावसाय प्रारंभ जरूर करावा पण तो व्यवसाय सामाजिक हित बाधित करणारा नसावा.या दिवशी रावणाची प्रतिकृती जाळली जाते.हे सहज आहे. यात कुठलाही पराक्रम नाही. तो संस्कृतीचा भाग जरी असला तरी वर म्हटल्याप्रमाणे सात्विकतेने हा सण साजरा करायचे ठरले तर राम होणं सोपं नाही. पण श्रीरामतत्वाला न शोभणारी एक जरी गोष्ट आमच्याकडे असेल तर कोणता रावण आम्ही जाळायला निघालोय याचा जरा तरी प्रश्न पडायला हवा.
आपल्यातल्या रावणाला बाहेर काढुन जाळता यायला हवे.हिदुंत्व हा पोरखेळ नाही.ती.विचारधारा नेहमीच असत्यावर सत्याला विजय मिळवून देणारी आहे. सणांचा पोरखेळ करण्याचा सपाटा आम्ही लावला आहे. कुठतरी हे थांबायला हवं.खरी सण परंपरा आम्हाला विजयी आणि आनंदी जीवन देणारी आहे. कारण आमच्या प्रत्येक सणाला इतिहास आहे. माझे गुरुदेल म्हणतात, ज्याला इतिहास नाही त्याला भविष्य नाही.आम्ही इतिहास जपुन सण साजरे केले तर महिशासुरासारख्या राक्षसांना संपवणाऱ्या मर्दिनी आजही जन्म घेतील.म्हणून परंपरा जपून सण साजरे केले तर भय संपुन आनंदी जीवन जगण्याचं बळ प्रत्येकाला प्राप्त होईल.
रामकृष्णहरी