Take a fresh look at your lifestyle.

सणासुदीत खाद्य तेल होणार स्वस्त !

सीमा शुल्कात केंद्राने केली कपात.

नवी दिल्ली : सणासुदीच्या दिवसांमध्ये खाद्य तेलाचा वापर वाढतो. परंतु सध्याच्या महागाईने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.केंद्र सरकारने सर्व सामान्यांना दिलासा देण्यासाठी पाम आणि सुर्यफूल तेलावरील कृषी उपकर आणि सीमा शुल्कात कपात केली आहे.
याआधी उपभोक्ता मंत्रालयाने तेल आणि तिलहनवर साठ्याच्या मर्यादेचा आदेश जारी केला होता. साठ्याची मर्यादा ३१ मार्च २०२२ पर्यंत लागू असणार आहे.राज्यांना आदेशाचे सक्तीने पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारच्या निर्णयानंतर खाद्य तेलांमध्ये साधारण १५ रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डने अधिसूचनेत म्हटले आहे की, शुल्कात कपात १४ ऑक्टोबरपासून प्रभावी होईल आणि ३१ मार्च २०२२ पर्यंत लागू असेल. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। 

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421