Take a fresh look at your lifestyle.

दैठणे गुंजाळच्या विद्यामंदिराला सामाजिक संस्थांची लाख मोलाची मदत !

शाळा खोल्या, प्रोजेक्टर आर.ओ. प्लॅंट आणि बरेच काही...

पारनेर : सध्याच्या युगात शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे मिळणे गरजेचे आहे नेमकी हीच गरज ओळखून तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसाठी कमिन्स इंडिया कंपनी,नाबार्ड बँक, ऐक्य सेवा सेंटर मार्फत विविध कामांच्या माध्यमातून लाख मोलाची मदत करण्यात आली.

दैठणे गुंजाळ येथे सरपंच पांडूरंग उर्फ बंटी गुंजाळ यांच्या नेतृत्त्वाखाली गावात विविध प्रकारची विकास कामे सुरू आहेत या कामाला सामाजिक संस्थांनी हातभार लावला आहे. या संस्थांनी प्राथमिक शाळेसाठी सहा खोल्या दिल्या असून त्यापैकी तीन पुर्ण झाल्या आहेत तर तीन खोल्यांचे बांधकाम सुरू आहे.

बदलत्या काळानुसार गावातील विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान अवगत व्हावे यासाठी काहीतरी नवीन उपक्रम सुरू झाले पाहिजेत या हेतूने ऐक्य सेवा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम वाखारे यांनी जि. प. शाळा व माध्यमिक विद्यालय दोन्ही ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त प्रोजेक्टर, एलईडी टी.व्ही, वेब कॅमेरा, पडदा ,स्पीकर हे साहित्य व पहिली ते दहावी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता यावे यासाठी एज्यूकेशन सॉफ्टवेअर बसवून दिले.
या संस्थांच्या वतीने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जेवणाचे बाकडे, पिण्याच्या शुद्धपाण्याची यंत्रणाही भेट देण्यात आली. तसेच शाळा व खंडेश्वर मंदिर परिसरात वड,पिंपळ,चिंच आदी.वृक्षांची लागवड करण्यात आली.

या मदतीबद्दल प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री.पवार, माध्यमिकचे मुख्याध्यापक श्री. वाखारे यांनी या मदतीबद्दल आभार मानले.तर श्री.वाखारे यांना सरपंच बंटी गुंजाळ यांच्या हस्ते आभाराचे पत्र दिले. या प्रसंगी भाऊसाहेब अण्णा, साहेबराव माधव गुंजाळ, सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांना देखील प्रगत शिक्षण मिळणे गरजेचे आहे मात्र, सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा या तुटपुंज्या स्वरूपाच्या असल्याने सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मिळणार्‍या मदतीचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल. अशा प्रकारच्या शैक्षणिक मदतीसाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार महत्त्वाचा आहे.
 बंटी गुंजाळ
 सरपंच, दैठणे गुंजाळ