Take a fresh look at your lifestyle.

पारनेरातील “या” गावात सलग तिसऱ्यांदा ‘लॉकडाऊन’ !

रुग्णसंख्येत घटच होईना ; चिंता वाढली.

0

 

पारनेर : राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असतानाच नगर जिल्ह्यातील आकडा थांबायलाच तयार नाही. कोरोना बाधित रुग्णांची संख्या विचारात घेता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील सात तालुक्यातील 21 गावांमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या गावांमध्ये 14 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या काळात कडक निर्बंध असणार आहेत.दरम्यान् जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार तालुक्यातील जामगाव हे सलग तिसऱ्यांदा ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे.
याबाबत बुधवारी रात्री कडक निर्बंधाचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या सहीने जाहीर केले. या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यातील दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या 300 ते 500 दरम्यान आढळून येत आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 3 ते 5 टक्के दरम्यान आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी ज्या गावांत कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे तेथे लॉकडाऊन जाहीर केला जात आहे.
मागील आठवड्यात जिल्ह्यातील 69 गावांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला होता. त्याची मुदत संपुष्टात आली आहे. यानंतर आता पुन्हा जिल्ह्यातील 21 गावांमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी 14 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या काळात कडक निर्बंध जाहीर केले आहेत.
बुधवारी लॉकडाऊन जाहीर केलेल्या गावांमध्ये वीरगाव, सुगाव बु., कळस बु. (ता. अकोले), टाकळी (ता. कोपरगाव), चांदा (ता. नेवासा), जामगाव, वासुंदे, (ता. पारनेर), उंबरी, वेल्हाळे, चंदनापुरी, वडगाव पान, राजापूर, नांदुरी दुमाला, मालदाड, सुकेवाडी, ओझर बु., जोर्वे (ता. संगमनेर), पिंपळगाव माळवी (ता. नगर), लोणी व्यंकनाथ, घारगाव, कोथूळ (ता. श्रीगोंदा) अशा 21 गावांचा समावेश आहे.
दरम्यान,तालुक्यातील जामगाव येथील वाढती रुग्णसंख्या विचारात घेता जामगाव हे पहिल्यांदा बंद करण्यात आले होते. प्रशासनानेही नियमांची कडक अंमलबजावणी केली होती मात्र,तरीही रुग्णसंख्येत वाढच होत असल्याने हे गाव सलग तिसऱ्यांदा लॉकडाऊन करण्यात आले आहे.ऐन सणासुदीच्या काळात तालुक्यातील जामगाव हे तिसऱ्यांदा बंद करण्यात आल्याने व्यापारीवर्ग अडचणीत सापडला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.