Take a fresh look at your lifestyle.

विकार जन्माला येण्याचं कारण काय?

पंचकोश शुद्धीने विकारांवर नियंत्रण राहते !

हिंदुधर्म शास्राने पंचकोश सांगितले आहेत. पंचकोश : पृथ्वीवर दृश्यमान असलेल्या प्रत्येक जीवाचे शरीर हे पाच कोशांनी युक्त असते.कोश म्हणजे पडदा.आळी कोशातुन बाहेर पडताना कोशाचा पातळ पडदा भेदुन बाहेर येते.त्या अर्थाने कोश या शब्दाचे प्रयोजन आहे.या पंचकोशांची थोडक्यात माहिती पाहु.
पहिला अन्नमय कोश : प्रत्येक जीवाचे दृश्य स्वरूपात शरीर असते, ते स्थूल शरीर त्या जीवाने ग्रहण केलेल्या सर्व प्रकारच्या अन्नातून आणि अन्नामुळे उत्पन्न झालेले असते. या दृश्यमान कोशाला म्हणजे आवरणाला अन्नमय कोश असे म्हणतात.
दुसरा प्राणमय कोश : प्राण, अपान, व्यान, उदान, समान या पाच वायूंनी युक्त असलेल्या कोशाला प्राणमय कोश असे म्हणतात. हा कोश पाच कर्मेंद्रिये म्हणजे वाणी,हात,पाय,गुदा आणि उपस्थ यांनी युक्त असतो.
तिसरा मनोमय कोश : पाच ज्ञानेंद्रिये नाक,कान,डोळे,जिभ,त्वचाआणि मन यांचा मिळून मनोमय कोश होतो. मनोमय कोशाच्या ठिकाणी इच्छाशक्ती असते. त्यामुळे तो साधनरूप मानला जातो
चौथा विज्ञानमय कोश : पाच ज्ञानेंद्रिये नाक,कान,डोळे,त्वचा,जिभ आणि बुद्धी यांचा विज्ञानमय कोशात अंतर्भाव होतो. या कोशात ‘मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे’ इत्यादी प्रकारची अभिमान-जाणीव अहंभाव बाळगतो. या कोशाला ‘इहलोक-परलोकगामी’ असेही म्हणतात. या विज्ञानमय कोशाच्या ठिकाणी ज्ञान-शक्ती असते. त्यामुळे तो ‘कर्तृस्वरूपी’ मानला जातो.
पाचवा आनंदमय कोशः आनंदाने ओतप्रोत असूनही एखाद्या कोशाप्रमाणे नित्यशुद्ध आनंदाला झाकणारा,बंदिस्त ठेवणारा आहे. सर्वांत आत असलेल्या या कोशाला आनंदमय कोश असे म्हणतात. याचा संबंध कारण आणि महाकारण देहाशी असतो.
पंचकोशांची संकल्पना समजून घेताना प्रत्येक जीवाच्या चार देह संकल्पना लक्षात घ्याव्यात. प्रत्येक व्यक्तीला स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह असे चार देहाचे प्रकार शास्रात सांगितले आहेत. पैकी स्थूल देह : दृश्यमान असलेले असे जीवाचे जे शरीर असते, त्याला स्थूल देह असे म्हणतात.जीवाने ग्रहण केलेल्या अन्नामुळे आणि अन्नातून हे उत्पन्न झालेले असते.आपण कुटुंब व्यवस्थेत रहातो.धान्य,किराणा,भाजीपाला,पाणी,अग्नी यांच्या संयोगाने अन्न तयार करुन आपण खातो.त्यापासून आमचा देह पुष्ट होतो,वाढतो त्याचा विकास होतो.
सर्व सात्विक असात्विक विचार अन्नग्रहन केल्याने तयार होतात.घरात आलेलं धान्य, किराणा कशा कमाईतून आलेला आहे?तो सतमार्गाने आला आहे की वाममार्गाने यावर विचार केला असता उत्तर मिळेल.
हे लगेच पचनी पडण्यासारखे आणि आचरणात सहजतेने येणारे नाही. याची कल्पना असुनही आज हा किचकट विषय चिंतनासाठी मुद्दाम घेतला आहे. आपण फक्त वाचावे.याचं सहज सुलभ चिंतन पुढे आपण घेणारच आहोत.पण तेव्हा या शब्दांची ओळख असावी म्हणून हा प्रयत्न आहे.
रामकृष्णहरी