Take a fresh look at your lifestyle.

पुण्यातील ‘त्या’ घटनेवर अजित पवार संतापले, म्हणाले…

 

पुणे : बिबवेवाडीतील मैदानात कबड्डी खेळत असताना एका 14 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या घटनेवर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून अत्यंत निंदनीय आहे.कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेने खाली गेली आहे. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ न येऊ देणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे अजित पवार म्हणाले आहेत.
पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणे गंभीर बाबा असून समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी यावर विचार करणे गरजेचे आहे. एका अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणारा व्यक्ती माणूस असूच शकत नाही, हे कृत्य राक्षसी आहे. असेही अजित पवारांनी म्हटले आहे.
दरम्यान, एकतर्फी प्रेमातून हे कृत्य करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हे दाखल केले आहेत, आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे .