Take a fresh look at your lifestyle.

पारनेरमध्ये जिल्हास्तरीय कराटे खेळाडू निवड चाचणी स्पर्धा संपन्न !

पारनेर : येथील क्रीडा संकुलात नगर जिल्हा तेंग सुडो असोसिएशनच्या वतीने निवड चाचणी स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक नंदकुमार औटी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विजय तराळ,स्वप्नील गोरे, बंडू कुंभार ,प्रथमेश रोहोकले ,अक्षय कावरे, तुषार ठुबे,काष्टी ग्रामपंचायत सदस्य पुनम बाळासाहेब धुमाळ, प्रकाश कांदलकर, इत्यादी उपस्थित होते.या स्पर्धेसाठी 135 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.श्रीरामपूर,कर्जत, श्रीगोंदा,जामखेड,नेवासा,संगमनेर,अकोले तालुक्यांनी उपस्थिती दाखवली. कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांनी प्रथम द्वितीय तृतीय पदके मिळविली.
या स्पर्धेत पंच म्हणून मास्टर योगेश वागस्कर, मास्टर वैशाली बांगर ,शुभम राहिंज, तृप्ती कुंभार , प्रतीक्षा राहिंज ,भास्कर कावरे कल्याणी बोरा, अक्षदा गंधाक्ते ,किशोरी सोनवणे ,देवयानी जगताप ,अनुष्का मोरे, प्राची गायकवाड ,समृद्धी गायकवाड इत्यादी पंचांनी उत्कृष्ट कामगिरी केली या स्पर्धेतून निवडला जाणारा संघ 23 व 24 ऑक्टोबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जाणार आहे संकल्प स्पोर्ट फाऊंडेशनचे संस्थापक सेन्साई चंद्रकांत राहिंज यांचे मार्गदर्शन लाभले.निलेश लंके प्रतिष्ठानचे युवा अध्यक्ष विजुभाऊ औटी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.