Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : अतिवृष्टी व पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 10 हजार कोटींचे ‘पॅकेज’ !

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय.

 

 

मुंबई : आधीच अडचणीत सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांचे यावर्षी अतिवृष्टी आणि पूरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती आणि पिकांचे झालेले नुकसान पाहून अनेक शेतकऱ्यांनी अक्षरक्षा: हंबरडा फोडला. अनेकांनी राज्य सरकारकडे मदतीची विनंती केली. अखेर राज्यातील शेतकऱ्यांची ही विनंती राज्य सरकारने स्वीकारली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.
अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले.या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आज आपण घेतला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले.
▪️राज्य सरकारच्या मदतीचं स्वरुप ‘असे’ राहणार !
जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर,बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर
बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये, प्रति हेक्टर ही मदत 2 हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.