Take a fresh look at your lifestyle.

संकटाच्या काळात प्रामाणिक सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांची देशाला गरज !

पद्मश्री पोपटराव पवार यांचे मत.

नगर : आदर्श गाव हिवरे बाजार येथे ग्रामस्थांच्यावतीने नव्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता त्याप्रसंगी बोलताना पद्मश्री पोपटराव पवार यांनी संकटाच्या काळात प्रामाणिक सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांची देशाला गरज असल्याचे सांगितले.
पद्मश्री पवार पुढे बोलताना म्हणाले, तापमानातील होणारे बदल व कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जनजीवन भयभीत झाले आहे. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळी परिस्थिती पहावयास मिळत आहे. यामुळे शेतकरी व विद्यार्थीचे नुकसान होत असून सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. केंद्रशासन, राज्यशासन, जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन, ग्रामपंचायत स्तर याची निर्मितीच आर्थिक क्षमता नसलेल्या वंचित घटकांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी झालेली आहे. म्हणून सर्वसामान्य माणसे त्याला “मायबाप सरकार” असे म्हटले जाते.

प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या हातामध्ये शेवटच्या घटकापर्यंत योजनेचा लाभ देण्याची जबाबदारी असते. प्रशासनात येण्याची संधी मिळणे हे परमेश्वरी कार्य आहे, असे मत पद्मश्री पवार यांनी याप्रसंगी मांडले.

नव्याने लोकसेवा आयोगाच्या दैठणे गुंजाळ येथील सुरज गुंजाळ यांचा तसेच अर्पिता ठुबे ( पवार वाडेकर) यांचा सत्कार करण्यात आला. समवेत एस. टी. पादीर सर, सरपंच बंटी गुंजाळ उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी दोघांनीही आपले अनुभव विद्याथी आणि पालकांसमोर मांडले. अर्पिता ठुबे हि सेवानिवृत्त सहकार अधिकारी आर. आर. पवार यांची नात आहे.