Take a fresh look at your lifestyle.

अजित पवारांना आता कोणीही वाचवू शकत नाही !

किरीट सोमय्यांनी साधला पुन्हा निशाणा.

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना, नातेवाईकांना, संबंधित साखर कारखान्यांना टार्गेट केले आहे. राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सोमय्या यांनी निशाणा साधला आहे. अजित पवारांना आता कोणीही वाचवू शकत नाही, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

अजित पवारांची एवढी समृद्धी आहे की किरीट सोमय्यांनी पाहायला यावं असे मेसेज फिरतात, तर त्यांच्या कारस्थानाचा एक नमुना आज मी जनतेसमोर आणणार आहे, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
ठाकरे, पवार यांनी दीड वर्षात अनेक घोटाळे केले, मंत्रालयासमोर बॅनर लावले, माझ्या कुटुंबियांवर आरोप केले, तर उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यात हिम्मत असेल तर माझे घोटाळे बाहेर काढा, चौकशी करा, शिक्षा करा. तुमचे दोन डझन नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले, सातव्या दिवशीही घोटाळे बाहेर निघत आहे, असेही किरीट सोमय्या म्हणालेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख, सेशन कोर्टापासून कुठल्याच कोर्टाने हात धरला नाही, त्यामुळे मान्य करा की तुम्ही घोटाळे करत आहात, असं सोमय्या म्हणाले.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परब, प्रताप सरनाईकांसाठीही उद्धव ठाकरे कोर्टात गेले, काय झालं? भावना गवळींच्या ट्रस्टमध्ये 22 कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ठाकरे साहेबांना दिसत नाही. नेते घोटाळा करतात शरद पवार, उद्धव ठाकरेंना दिसत नाही? भावना गवळींनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे. घरात 25 कोटी कॅश ठेवली, अखेर तो मां का बुलाया आया हैं, आर्थर रोड जेल जानाही पडेगा, असा घणाघातही किरीट सोमय्या यांनी केला.