Take a fresh look at your lifestyle.

तहसीलदार अचानक थेट टेम्पोत चढतात तेंव्हा ..!

'या' प्रकाराची रंगली जोरदार चर्चा .

राहुरी : नुसते तहसीलदार आले म्हटले तरी अवैध व्यावसायिकांची मोठी धांदल उडते. वाळु तस्करांची तर पळता भूई थोडी होती. परंतू राहुरीत मात्र वेगळेच घडले. स्वस्त धान्य दुकानाला पुरवठा होणाऱ्या टेम्पोत चढून तहसीलदारांनी मालाची तपासणी केली. त्यांच्या या धडक कृतीने काळ्याबाजाराला आळा बसणार आहे.या प्रकाराची तालुक्यात जोरदार चर्चा आहे.

आपल्या समाजाभिमूख कामाने नेहमी सर्वसामान्य माणसांच्या गळ्यातील ताईत बनलेले राहुरीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांनी स्वस्त धान्य वाहतूक करणाऱ्या थेट टेम्पोत अचानक चढूनच मालाची तपासणी केली. त्याची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

मोफत धान्य वितरण व्यवस्थेमार्फत मिळणारे धान्य लाभार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचते की नाही याची शहानिशा करण्यासाठी राहुरीचे तहसीलदार
फसीयोद्दीन शेख यांनी तालुक्यातील पूर्व भागात दौऱ्यावर असताना अचानक टेम्पो थांबवून त्या टेम्पोत चढून धान्याची पोती मोजून घेत शहानिशा केली.

तालुक्याचा मोठा कारभार पहात असताना छोटा घटक दुर्लक्षित राहणार नाही यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे तहसिलदार शेख यांच्या कार्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.