Take a fresh look at your lifestyle.

‘या’ किचन टिप्स येतील तुमच्या कामी…!  

काम होईल सोपे आणि मजेदार.

 

आज महिलांसाठी काही उपयुक्त टिप्स जाणून घेऊयात. यामुळे तुमचे किचनचे काम मजेदार आणि सोपे होईल…
● बदामावरील टरफल काढण्यासाठी बदाम 15 ते 20 मिनिट गरम पाण्यात भिजत ठेवा.
● साखरेच्या डब्यात 3-4 लवंगा टाका. अशाने डब्याला मुंग्या चिकटत नाहीत.

● कापलेले सफरचंद लवकरच काळे पडतात. हे टाळण्यासाठी कापलेल्या सफरचंदावर लिंबाचा रस लावा.
● कुठेही भाजले असेल तर त्या ठिकाणी केळी कुस्करून लावा. याने आराम मिळतो.
● लसूण सहजपणे सोलता यावे यासाठी ते पाण्यात भिजवा आणि नंतर त्याचे टरफल काढा.
● हिरवी मिरची जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी तिची देठे काढून टाका.
● मटार हिरवे राहण्यासाठी पॉलिथिनमध्ये बांधून फ्रिजमध्ये ठेवावे.

● कडू कारले टेस्टी आणि क्रिस्पी बनविण्यासाठी ते मधोमध कापून अर्धा तास मीठ, पिठ आणि दह्यात ठेवावे.
● भांडे जळाले असेल तर त्यात कापलेले कांदे आणि गरम पाणी टाकून 5 मिनिटे ठेवा आणि नंतर स्वच्छ करा. भांडे चकाचक होईल.
● मिरची पावडर लवकर खराब होऊ नये यासाठी त्यात हिंगाचे पाकिट ठेवा.