Take a fresh look at your lifestyle.

अबब…एकाच कपाटात सापडले ‘एवढे’ कोटी रुपये !

पाहून आयकर अधिकारीही चक्रावले !

0

 

हैदराबाद : आयकर विभागाने हेटेरो फार्मास्यूटिकल ग्रुपवर छापेमारी केलीय. या छापेमारीदरम्यान आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले. कारण, हेटेरो फार्मास्टूटिकलच्या कार्यालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना एका अलमारीत तब्बल 142 कोटी रुपये सापडले आहेत. एवढी मोठी रक्कम पाहून आयकर अधिकारीही चक्रावून गेले. ही कंपनी आपल्या अधिकाधिक उत्पादनांची निर्यात विदेशात करते. त्यात अमेरिका, यूरोप, दुबई आणि अन्य आफ्रिकी देशांचा समावेश आहे. आयकर विभागाने 6 राज्यातील जवळपास 50 ठिकाणी तपासणी मोहीम राबवली आहे.
▪️बनावट कंपन्यांचा घोटाळाही उघड
आयकर विभागाच्या छाप्यावेळी खात्यांची पुस्तकं आणि रोख रक्कम मिळून आली. डिजिटल उपकरणे, पेन ड्राईव्ह, अनेक कागदपत्रे या छापेमारीच जप्त करण्यात आली आहेत. या छापेमारीवेळी अनेक बनावट आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून करण्यात आलेल्या खरेदीबाबत मोठा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
 ▪️बँकेचे 16 लॉकरही चालू
जमीन खरेदीसाठी पैसे भरल्याचा पुरावाही सापडला आहे. त्यासह इतर अनेक कायदेशीर समस्या देखील ओळखण्यात आल्या आहेत. त्यात कंपनीच्या पुस्तकांमधील वैयक्तिक खर्च आणि संबंधित सरकारी नोंदणी मूल्याच्या खाली खरेदी केलेली जमीन, याचा समावेश आहे. अधिकारी म्हणाले की, तपासादरम्यान अनेक बँक लॉकर सापडले आहेत, त्यापैकी 16 लॉकर चालवले जात आहेत.
▪️सुमारे साडेपाचशे कोटींची बेहिशोबी मालमत्ता
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या मते, हैदराबाद येथील एका अग्रगण्य फार्मास्युटिकल कंपनीवर 6 ऑक्टोबर रोजी छापेमारी करण्यात आली होती. आतापर्यंत सुमारे 550 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. अघोषित उत्पन्न शोधण्यासाठी आयकर विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.