Take a fresh look at your lifestyle.

हास्यरंग

"ती" भिती तर गेलीच आणि पैसेही वाचले ! 

 

 

एक माणूस मानसोपचार तज्ञाकडे जातो

▪️ डाॅक्टर : बोला काय त्रास आहे तुम्हांला ?

🔸 पेशंट: मी रात्री बेड वर झोपल्यानंतर मला सतत जाणवतं की बेड खाली कोणी तरी आहे. मी रात्रभर उठून बघतो, पण तेथे कोणीच नसतं

▪️ डाॅक्टर : ठीक आहे, मी तुम्हांला गोळ्या देतो, त्या घ्या, आणी पुढचे सहा महिने आठवड्यातून दोन रात्री दवाखान्यात झोपायला या, म्हणजे मला योग्य निदान करता येईल

🔸 पेशंट : ठीक आहे, तुमची एकंदर फी किती होईल ?

▪️ डाॅक्टर :गोळ्यांचे ५ हजार व सहा महिने दवाखान्यात झोपण्याचे एका वेळचे १५०० रूपये प्रमाणे होतात ७२,००० हजार, एकंदर ७७,००० हजार

🔸 पेशंट : ठीक आहे डाॅक्टर. मी उद्यापासून येतो.

पुढे एक वर्षांनी तो पेशंट डॉक्टरांना रस्त्यात भेटतो

▪️ डाॅक्टर :अरे, तुम्ही आलाच नाहीत उपचार घेण्यासाठी

🔸 पेशंट : डाॅक्टर मला माझ्या शिक्षक मित्रांनी त्याच दिवशी सल्ला दिला, व मी पूर्ण बरा झालो.

▪️ डाॅक्टर: काय सल्ला दिला ?

🔸 पेशंट : मित्र म्हणाला, डाॅक्टरला एवढे पैसे देण्यापेक्षा, बेड आजच विकून टाक, मी तसेच केले, व गादी जमीनीवर टाकून झोपायला सुरूवात केली, त्यामुळे बेड खाली कुणी तरी आहे, ही भिती गेली व ७७,००० तुमची फी वाचली व बेड चे सहा हजार आले.