Take a fresh look at your lifestyle.

प्राथमिक शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निकाली काढणार !

शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) बी.जी.पाटील यांचे आश्वासन

 

नगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळाच्या वतीने नगर जिल्हा परिषदेत नव्याने रुजू झालेले प्राथमिकचे शिक्षणाधिकारी बी.जी. पाटील यांचा सत्कार जिल्हा परिषद मध्ये शिक्षणाधिकारी यांच्या दालनामध्ये आयोजित करण्यात आला होता.
यावेळी राज्य शिक्षक परिषदेचे नेते रावसाहेब रोहोकले यांनी प्रामुख्याने शिक्षकांचे विलंबाने होणारे पगार,वरिष्ठ वेतनश्रेणीची प्रकरणे व मुख्याध्यापक पदोन्नत्या हे विषय मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली.यावेळी माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी श्री. शिवाजी शिंदे यांचाही सत्कार रोहोकले गुरूजी यांनी केला.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करत असताना नूतन शिक्षणाधिकारी पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न समजून घेत असताना प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन उशीराने का होते या बाबीचा अभ्यास करून प्राधान्याने अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन दरमहा पहिल्यांदा १० तारखेच्या आत नंतर ५ तारखेच्या आत करण्याबाबत निश्चित प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले.
मावळते प्रभारी शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांनी आंतरजिल्हा बदलीने बदलून आलेले प्राथमिक शिक्षक यांची पदस्थापना तसेच न्यायालयीन आदेशाच्या पदस्थापना देण्याबाबतीत जिल्हा परिषद मध्ये कार्यरत असताना हे प्रश्न मार्गी लावण्यात यश आल्याचे समाधान आहे.
त्याच बरोबरच वरिष्ठ वेतनश्रेणी प्रकरणे, मुख्याध्यापक व इतर पदोन्नत्या बाबतीत कार्यवाही सुरू करण्यात आली असून ही कार्यवाही देखील दिपावलीच्या आसपास नूतन शिक्षणाधिकारी पूर्ण करतील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी राज्य शिक्षक परिषदेचे नेते रावसाहेब रोहोकले यांनी शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने त्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी योग्य ते निर्णय घ्यावेत त्यासाठी संघटना प्रशासनाबरोबरच राहील असे वचन यावेळी दिले.
यावेळी राज्य उपाध्यक्ष संजय शेळके, जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे,गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे,विकास मंडळाचे मा.अध्यक्ष संजय शिंदे व विश्वस्त मच्छिंद्र कोल्हे,केंद्रप्रमुख परिषदेचे दिलीप दहिफळे, सुहाग साबळे,संजय दळवी,बाळासाहेब वाबळे,बबनराव मते,बाबा धरम,भाऊसाहेब फंड,प्रभाकर झेंडे,संदिप सुंबे,गणेश वाघ आदी उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष खामकर यांनी केले.