Take a fresh look at your lifestyle.

बायकोला खूश ठेवण्यासाठी काही पण…!

'त्याने' केले असे काही..झाली चर्चाच चर्चा.

बायकोच्या इच्छा पूर्ण करताना अनेकांच्या नाकीनऊ येतात. एका व्यक्तीने तर बायकोच्या तक्रारींना कंटाळून चक्क फिरते घर बांधले आहे. सध्या या फिरत्या घराची सगळीकडेच चर्चा सुरु आहे.
या व्यक्तीचे लायकीचे नाव वोकिन कुसिक असून त्याने बायकोच्या इच्छेसाठी 360 अंशात फिरणारे घर बनवले आहे. हे घर उत्तर बोस्नियातील सर्बैक शहरातील एका मैदानात बनवले गेले आहे. या घराच्या खिडकीतून सकाळचा सूर्योदय आणि संध्याकाळचा सूर्यास्तही दिसतो. तर घर फिरल्यावर रस्त्यावरील माणसे दिसतात.

पत्नीची घराबाहेर वेगवेगळी दृश्ये पाहण्याच्या इच्छेखातर घराबाहेरील इंटेरियर बदलून आपण थकलो होतो, असे 72 वर्षांच्या वोकिन यांनी सांगितले. मग बायकोची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यातून 360 अंशात फिरणारे घर बनवण्याची कल्पना पुढे आली.
विशेष म्हणजे या घराचे डिझाईन स्वतः कुसिक यांनी केले आहे. हे घर सात मीटरच्या परिघात 360 अंश फिरते. त्यातून सूर्योदय, सूर्यास्त, मक्याची शेती, रस्त्यावरील वाहतूक असे विविध दृश्ये दिवसात पाहता येतात. हे घर 24 तासात सर्वात कमी गतीने पूर्ण फेरी पूर्ण करते. तर वेगात 22 सेकंदात घर पूर्ण फेरी करते.
कुसिक यांनी बनवलेले हे भन्नाट घर त्यांच्या बायकोला एवढे आवडली कि, तिने या घराबाबत अद्यापपर्यंत एकही तक्रार केलेली नाही. कुशीक सांगतात, अमेरिकी आणि सर्बियातील अनेक घरांचा अभ्यास करून त्यांनी या घराची निर्मिती केली आहे.