Take a fresh look at your lifestyle.

अमिताभ बच्चन आता “या” जाहिरातीत दिसणार नाहीत !

बिग बींनी उचलले मोठे पाऊल.

0
मुंबई : बॉलीवुडचे सुपरस्टार ‘बिग बी’ अर्थातच अमिताभ बच्चन यांना एका पान मसालाच्या जाहिरातीमुळे काही दिवसांपूर्वी टीकेचा सामना करावा लागला होता. यावेळी टीका करणाऱ्यांना उत्तर देत बिग बींनी देत स्पष्टीकरण देखील दिले होते. मात्र त्यानंतर आता बिग बच्चन यांनी मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी पान मसाला कंपनीसोबत जाहिरातीसाठी केलेला करार मोडला आहे. इतकेचं नव्हे तर या जाहिरातीसाठी मिळालेले मानधन देखील त्यांनी कंपनीला परत केले आहे.
यावेळी बिग बींनी करार मोडत असताना ही जाहिरात ‘सरोगेट जाहिरात’ श्रेणीत येत असल्याची त्यांना कल्पना नव्हती असे या बाबत स्पष्टीकरण दिले. काही दिवसांपूर्वीच एका राष्ट्रीय तंबाखू विरोधी संघटनेने बिग बींना या जाहिरातीतून बाहेर पडण्याची मागणी केली होती. त्यानंतर बिग बींनी हे पाऊल उचलले आहे.
एका अधिकृत निवेदनातून अमिताभ यांनी ‘कमला पसंद’ ब्रॅडशी करार संपवल्याचे जाहीर केले. या निवेदनात त्यांनी म्हटलंय, “कमला पसंद…जाहिरात प्रसारित झाल्यानंतर काही दिवसातच मिस्टर बच्चन यांनी ब्रॅण्डशी संपर्क साधला आणि मागील आठवड्यात ते या जाहिरातीतून बाहेर पडले आहेत. जेव्हा ते या जाहिरातीशी जोडले गेले तेव्हा त्यांनी ती ‘सरोगेट जाहिरात’ श्रेणीत असल्याचे माहित नव्हते असे कंपनीला सांगण्यात आले.”
पुढे या निवेदनात अमिताभ यांनी ब्रॅण्डशी करार मोडून प्रमोशनसाठी मिळालेली रक्कम देखील परत केली असल्याचं सांगण्यात आलंय.
सरोगेट जाहिरातीची श्रेणी म्हणजेच सिगारेट, तंबाखू सारख्या जाहिराती ज्यांच्यावर बंदी आहे किंवा जी ठराविक वयोगटासाठी आहे असा होतो.
Leave A Reply

Your email address will not be published.