Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 12 ऑक्टोबर 2021  

 

▪️मेष : आज संयम बाळगून वागा. नकारात्मक घटना फार मनावर घेऊ नका. कटू गोष्टी अनुकूल करण्याची कला शिकून घ्या. आपली चिडचिड इतरांना दाखवू नका.
▪️वृषभ : व्यवसायात नीतिचा मार्ग अवलंबा. आजचा दिवस समाधानकारक ठरेल. नवीन ओळखीतून प्रतिष्ठा लाभेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन होईल.
▪️मिथुन : मौल्यवान वस्तु जपाव्यात. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल. मित्र व नातेवाईकांशी सलोख्याने वागा. उगाच वाईटपणा घेऊ नका.
▪️कर्क : सन्मानात वाढ होईल. मुलांच्या जबाबदार्‍या व्यवस्थित पार पाडाल. नवीन कामाकडे लक्ष ठेवा. जे मिळेल ते पदरात पाडून घ्या.
▪️सिंह : मिळकतीचा नवीन स्त्रोत उत्पन्न होईल. एखाद्या कामासाठी अधिक धावपळ करावी लागेल. कौटुंबिक तिढा सोडवायला मदत कराल.
▪️कन्या : जुन्या आजारांवर वेळीच लक्ष द्या. कोणतीही गोष्ट पुढे ढकलू नका. धनसंचयात वाढ होईल. व्यापारी क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षित यश मिळेल.
▪️तूळ : आनंदाची अनुभूति घ्याल. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील. एखादा मोठा व्यवहार पार पडेल. घरातील लोकांचा आनंद द्विगुणित होईल.
▪️वृश्चिक : कोणत्याही संशयित कामात अडकू नका. पराक्रमात वाढ होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अधिक धावपळ झाल्याने आराम करण्यावर भर द्यावा.
▪️धनु : मन:शांती लाभेल. विरोधक माघार घेतील. एखाद्या व्यक्तीची भेट संस्मरणीय ठरेल. सासरच्या व्यक्तींकडून लाभ मिळेल.
▪️मकर : आर्थिक व्यवहारात यश येईल. जुने प्रयत्न फलद्रुप होतील. कार्यालयीन सदस्य कौतुक करतील. जुनी सर्व कामे मार्गी लावाल.
▪️कुंभ : आज विचारपूर्वक पाऊले उचला. निराशाजनक घटना दुर्लक्षित कराव्यात. अडचणीतून मार्ग निघेल. मानसिक गुंतागुंतीत अडकू नका.
▪️मीन : जुने परिचित लोक भेटतील. भावंडांना मदतीचा हात पुढे कराल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी केली जाईल.