Take a fresh look at your lifestyle.

जे मिळालय त्याचा आनंद का नाही?

देहाचं मोल करताच येत नाही.

दारिद्र्य किंवा श्रीमंती पैशात मोजली जाते.ती जग रितच आहे.त्यामुळे आपण ऐषोआरामाचं जीवन जगु शकत नसलो की आपण दारिद्र्यात आहोत यावर आपणच शिक्कामोर्तब करतो.वास्तविक खरंच आपण गरीब आहोत का?आपण दारिद्र्य कशाला समजलो आहोत?आपण मनुष्य देहात जन्मलो ही श्रीमंती कळायला तयार नाही. करोडो रुपयांचा देह मिळाला आहे त्याचं महत्त्व नाही.
स्वतःला दरिद्री समजणारांनी स्वतःचे अवयव विक्रीस काढावेत.मग एका एका अवयवाची किंमत कळेल.साधे दात पडले तर एक फिक्स दात टाकण्यासाठी विस ते चाळीस हजार रुपये मोजावे लागतात.गुणिले बत्तीस किती झाले?पण आम्हाला त्याचं सोयरसुतक नाही. ते लवकर पडावेत म्हणून किती घाई?तंबाखू,गुटखा त्यासाठीच आहे. पुढे कँन्सरसारख्या व्याधी आहेत.नको ते आणि नको तितके खाऊन मधुमेह,लठ्ठपणाचे आजार आमच्या श्रीमंत असण्याचे द्योतक आहे. याचं मुळ कारण या देहाचं महत्त्व समजलं नाही हेच आहे.
तुकोबाराय म्हणतात,इहलोकीचा हा देह।देव इच्छिताती पाहे।।धन्य आम्ही जन्मा आलो।दास विठोबाचे झालो।।
देवांनी सुद्धा हेवा करावा इतका श्रेष्ठ मनुष्य जन्म आहे. आम्ही मनुष्यदेहात जन्माला आलो हिच धन्यता आहे. पण पुढचं मोठं कठीण आहे. तुकोबाराय धन्यता नुसत्या जन्माला येण्याला देत नाहीत तर ते म्हणतात, मनुष्य देह मिळुन विठ्ठलाचा दास होता आलं ही धन्यता आहे. विठ्ठलाचा दास होणं म्हणजे सत विचारांचा स्विकार करुन तसं आचरण करणे आहे.या ठिकाणी धर्माचरणच अपेक्षित आहे.
रामकृष्णहरी