Take a fresh look at your lifestyle.

लाडक्या लेकीच्या वाढदिवशी आमदार पित्याने शेअर केली “अशी” भावनिक पोस्ट !

माझी 'सायली' असंख्य लोकांच्या जीवनात ज्योत प्रज्वलित करणारी !

 

✒️ सतीश डोंगरे 

शिरूर : शिरूर- हवेलीचे आमदार अशोक पवार यांची कन्या डॉ. सायली हिचा काल वाढदिवस होता. आपल्या कन्येला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमदार पवार यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली असून आपली डाॅ. कन्या वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून समाजाची सेवा करतीय याचा अभिमान बाळगताना प्रथमच आमदारांच्या ह्रदयातील हळव्या कोपऱ्याचे दर्शन कार्यकर्त्यांना यानिमित्ताने पहावयास मिळाले.

आमदार पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर शुभेच्छा देताना नेमक्या काय भावना व्यक्त केल्या आहेत ते पाहू या…

आमची कन्या डॉ.सायली पवार हिला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

असे म्हणतात की, मुलगी ही घराचे चैतन्य असते. एक नव्हे तर दोन घरांची ज्योत असते. परंतु माझी मुलगी सायली फक्त दोन घरांची नव्हे तर डॉक्टर या भूमिकेतून अनेकांना आयुष्य प्रदान करून असंख्य लोकांच्या जीवनात सकारात्मक ज्योत प्रज्वलित करणारी आहे.

जनसेवेचा वारसा मला माझ्या वडिलांकडून लाभला. हा जनसेवेचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी सायलीने डॉक्टर हा पेशा निवडला. डॉक्टर या भूमिकेतून कार्य करीत असताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

मात्र या सर्व समस्यांवर चिकाटीने मात करीत, रुग्णसेवा करून तिने लोकांचे प्राण वाचवत केलेले कार्य अभिमानास्पद आहे. अत्यंत सुशील, समजदार प्रत्येकाला सांभाळून घेण्याची वृत्ती, प्रसंगी तिची काळजी घेण्याची पद्धत माझ्या आईचे स्मरण करून देते…

संकटाच्या काळात खचून न जाता निर्भीडपणे कार्य करीत, संकटांवर मात करून आज तिने यशाचे शिखर गाठले आहे.