Take a fresh look at your lifestyle.

‘पैसे नव्हते तर कुलूप कशाला लावलं’?

चोरीच्या 'त्या' चिठ्ठीचीच चर्चा!

एका अजब चोराच्या गजब चिठ्ठीचीच सध्या जोरदार रंगात आहे. ही घटना मध्य प्रदेशमधील देवास जिल्ह्यात घडली आहे. सविस्तर असे कि, चोराने घरात चोरी तर केली तर केली सोबत घर मालकासाठी चिठ्ठीदेखील लिहून ठेवली. ही चिठ्ठी पाहून सोशल मीडियावर चांगलाच हशा पिकलाय.

चोराने एका जिल्हाधिकाऱ्यांच्या घरात चोरी केली. त्यानंतर त्याने या चिठ्ठीत लिहीलं कि, ‘की जर पैसे नव्हते तर कुलूप लावायचं नव्हतं, कलेक्टर’. ही चिठ्ठी पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही. उपजिल्हाधिकारी त्रिलोचन सिंग गौर यांच्या घरी ही चोरी झाली. खाटेगाव तहसील येथे ते कार्यरत आहेत. गेले 15 ते 20 दिवस ते घरी नव्हते. यादरम्यानच चोरी झाल्यानंतर ही भन्नाट चिठ्ठी त्यांना सापडली.

जेव्हा गौर घरी परतले तेव्हा त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं आढळलं. याशिवाय रोख रक्कम आणि दागिने गायब आढळल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली. चोरीच्या घटनेसंदर्भातील दुसरी भन्नाट गोष्ट म्हणजे या उपजिल्हाधिकाऱ्यांचं घर हे एका आमदार आणि देवासचे उपविभागीय दंडाधिकारी प्रदीप सोनी यांच्या घरांच्या मधोमध आहे. तर पोलिस अधिक्षकांच्या निवासस्थानापासून मोजक्याच अंतरावर असल्याने चोरी झालीच कशी? यावरून सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.