Take a fresh look at your lifestyle.

शैक्षणिक कार्याबद्दल विष्णू कर्पे यांना ‘नॅशनल बिल्डर्स अॅवार्ड’

रोटरी क्लबने केला सन्मान.

✍️ सतीश डोंगरे
शिरूर : गेली 29 वर्षे अविरत शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गुनाट येथील विष्णू कर्पे सर यांना रोटरी क्लब ऑफ शिक्रापूर यांच्या वतीने राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त हारुण आत्तार यांच्या हस्ते ‘नॅशनल बिल्डर अवार्ड’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री. आत्तार म्हणाले, शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांसमोर समस्या ठेऊन या समस्या सोडविण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक क्षमता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. उर्जा उद्योग समूहाचे उद्योजक प्रकाश कुतवळ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, शिक्रापूर रोटरीचे अध्यक्ष रमेश भुजबळ, सचिव मनोहर परदेशी, संस्थापक अध्यक्ष विरधवल करंजे, माजी सचिव डॉ. मच्छिंद्र गायकवाड, शिक्रापूरचे उपसरपंच रमेश थोरात, ग्रामपंचायत सदस्या पूजा भुजबळ, शिरूर-हवेली शिक्षक संघाचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, उद्योजक रवींद्र भुजबळ आदी उपस्थित होते.
विष्णू कर्पे सर यांच्यासह मारुती कदम, तुकाराम बेनके, सुमन जंगम ,आयुब तांबोळी, बापू लोंढे, संतोष परदेशी, अलका शिंदे, शैलेश बोराडे, नितीन माने, तानाजी पोखरकर, अशोक भंडारे, मंगला शिंदे, सिताराम मोहिते, महेश इंगळे, मीनाक्षी चेडे, रावसाहेब खळदकर, शारदा फुलावरे, शरद दौंडकर आदींसह 21 शिक्षकांचा नेशन बिल्डर अॅवार्ड देऊन सन्मान करण्यात आला. संजीव मांढरे यांनी सूत्रसंचालन केले व मयूर करंजे यांनी आभार मानले.
ज्ञानदाना सारखे पवित्र काम करीत असताना आपल्या प्रदीर्घ सेवेत विष्णू कर्पे सर यांनी अनेक चांगले विद्यार्थी घडविले. गुनाट गावामध्येही धार्मिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असतो. त्यांच्या या कार्याची दखल घेतल्याबद्दल शिक्रापूर येथील रोटरी क्लबचे गुनाट ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद !