Take a fresh look at your lifestyle.

‘महाराष्ट्र बंद’मध्ये ‘लालपरी’ही सहभागी !

राज्यभरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली.

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या शेतकरी हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे.या बंदमध्ये गावागावात पोहोचलेली लालपरी म्हणजेच एस.टी.बसनेही सहभाग घेतल्याने मुंबईसह राज्याची वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.
या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे.
केंद्र सरकारला या बंदमधून सरकारला इशारा देण्यासाठी जनेतेने स्वतःहून पाठिंबा देण्यासाठी बंदमध्ये सहभागी असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केले होते. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष या बंद मध्ये सहभागी झाले आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
किसान सभेच्या सर्व शाखा महाराष्ट्र बंदमध्ये अत्यंत सक्रियपणाने सहभागी होत आहेत. किसान सभेचे काम आलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये गाव, शहर, तालुका व जिल्ह्यामध्ये ‘बंद’ यशस्वी करण्यासाठी सर्व समविचारी पक्ष व संघटनांच्या तातडीने बैठका घेऊन बंदचे नियोजन करण्याचे आवाहन शाखांना केले आहे, अशी माहिती किसान सभेने दिली आहे. ‘जनतेने या बंदमध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन किसान सभेकडूनही करण्यात आले होते.
मुंबईतील चाकरमान्यांना डब्बा पुरवणाऱ्या मुंबईतील डब्बेवाल्यांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या बंदला पाठिंबा दिला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून हा बंद असणार आहे. त्यामुळे बंद जरी सुरू असला तरी काम सुरू राहणार आहे, असंही डब्बेवाला संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.
लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या तिन्ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. राज्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र बंद सुरू झाला आहे. शाळा आणि महाविद्यालय बंद आहे. तर दुसरीकडे मुंबईची बेस्ट वाहतूक सेवाही बंद आहे. त्याच पाठोपाठ गावागावात पोहोचलेली एसटी बस सेवा सुद्धा बंद आहे. शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेने याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होताना दिसत आहे.
तर दुसरीकडे, आजच्या बंदमध्ये बेस्ट वर्कर्स युनियन सहभागी होणार नाही. बेस्ट ही अत्यावश्यक सेवा आहे. अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असा शासनाचा निर्णय असताना बेस्ट बंदमध्ये सहभागी होऊ शकत नाही, बेस्ट कामगार सेना कर्मचाऱ्यांना बंदचे आवाहन करून राज्य सरकारच्या निर्णयाचे उल्लंघन करत आहे, असा आरोप कामगार नेते शशांक राव यांनी केला आहे.