Take a fresh look at your lifestyle.

आजचा महाविकास आघाडीचा ‘महाराष्ट्र बंद’ म्हणजेच,चोराच्या…

'या' माजीमंत्र्यांनी डागली राज्य सरकारवर तोफ.

पुणे : ज्यावेळी मावळमध्ये शेतकऱ्यांवर बेछूट गोळीबार झाला होता, त्यावेळी महाराष्ट्र बंद झाला होता का ?’असा सवाल माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे.आजच्या महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिका केली आहे.
सदाभाऊ खोत म्हणतात,“लखीमपुरची घटना ही खरोखर क्लेशदायक आहे आणि त्यामध्ये जी लोक दोषी असतील त्यांच्यावर तिथल्या सरकारने कारवाई केली पाहिजे.”
” महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. पहिल्यांदा महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या का करतो आहे? महाराष्ट्रातला बस चालक व कंडक्टर आत्महत्या का करतो आहे? राज्यातल्या शेतकऱ्यांना शेतमजुराला बाराबलुतेदारला तुम्ही वाऱ्यावर सोडले आणि तुम्ही साजूक पणाचा आव आणायचा प्रयत्न करत आहात.”असे खोत यांनी म्हटले आहे.
“ज्यावेळी मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता, त्यावेळी महाराष्ट्र बंद झाला होता का ? व त्याचबरोबर ऊस आंदोलनामध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होते, त्यावेळी सुद्धा महाराष्ट्र बंद झाला होता का ? आणि ते गोळीबार कोणी करायला सांगितले होते ?”असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.