Take a fresh look at your lifestyle.

छगन भुजबळांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करणार !

राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे यांची माहिती.

 

पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने नगर जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती महात्मा फुले समता परिषद , राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे यांनी दिली.
मंत्री भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण , रुग्णांना फळांचे वाटप,नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर , दंतरोग तपासणी ,सर्व रोग तपासणी शिबीर तसेच महात्मा फुले समता परिषदेच्या शाखांचे उदघाटन असे विविध कार्यक्रम कोरोनाविषयक नियमांचे पालन करून राबविले जाणार असल्याचे श्री. लोंढे यांनी सांगितले.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचा 15 ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा होत आहे.वाढदिवसाच्या दिवशी मंत्री भुजबळ हे दिवसभर भुजबळ फार्म ,नाशिक येथे उपस्थित राहून शुभेच्छा स्विकार असल्याचेही श्री. लोंढे यांनी सांगितले.