Take a fresh look at your lifestyle.

पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत साडेतेरा हजार गोण्यांची आवक !

रविवारचा कांदा : बाजारभाव

पारनेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात रविवारी ( १० ऑक्टोबर) रोजी झालेल्या कांदयाच्या लिलावात १३ हजार ५३८ गोण्यांची आवक झाली.
यावेळी १ ते २ लॉटला प्रतिक्विंटल ४२०० ते ४४०० रूपये बाजारभाव मिळाला तर १ नंबरला ३५०० ते ४१००, २ नंबरला २००० ते ३४०० तर ३ नंबरला ५०० ते १९०० रूपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. आठवडयातून दर रविवारी, बुधवारी व शुक्रवारी कांदा लिलाव होत असतात. शेतकऱ्यांनी आपली फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीतच कांद्याची विक्री करावी असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.