भोग वाट्याला येण्याचं एक बलिष्ठ कारण म्हणजे अन्न कुणाचं खातो यावर ते ठरतं.
अभिमन्यु चक्रव्यूहात अडकला आणि युद्ध करता करता शेवटी तो धारातीर्थी पडला.शेवटच्या घटका मोजत असताना त्याने कर्णाला पाणी मागितले. जवळच स्वच्छ पाण्याचे डबके होते.शेवटच्या क्षणी पाणी पाजले पाहिजे असे मनोमन कर्णाला वाटले पण तसं तो करु शकला नाही. आयुष्यभर दानशूर पदवी लावणाऱ्या कर्णाला घोटभर पाणी दान करता आले नाही. त्याला दुर्योधनाचं अन्न त्याने खाल्ल होतं त्यामुळे त्याची मर्जी राखणं त्याला जास्त महत्वाचं वाटलं.आपण चुकीच्या पक्षात आहोत असं कर्णाला कधीच वाटलं नाही. कारण त्यानं त्याला अंगदेशाचा राजा केला होता.
सत्याची वाट प्रलोभनांना बळी पडली.पुढे त्याच पाण्याच्या डबक्यात कर्णाच्या रथाचं चाक रुतलं आणि त्याचा युद्धात अंत झाला.
आपल्याही जीवनात असे प्रसंग येतात.मैत्री कुणाबरोबर करावी याचं फार प्रावधान राखलं पाहिजे दुबळ्या मित्रांकडून काही मिळत नाही पण आर्थिक सबळ मित्रांकडे सरबराई चांगली होते,आपली कुवत नसताना महागड्या गाडीत बसायला मिळते,महागड्या हॉटेलमध्ये जेवायला मिळते.यात वाईट काहीच नाही. मैत्रीत हे सहज होतं पण मित्र दुर्योधनासारखा असला तर?…
आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये। अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421