Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 11 ऑक्टोबर 2021  

0

 

▪️मेष : भौतिक विकास होऊ शकेल. व्यवसाय विस्ताराच्या कल्पनांना मूर्त रूप द्या. साधा व सोपा मार्ग स्वीकारा.
▪️वृषभ : नवीन योजनांकडे अधिक लक्ष द्या. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील. मनातील शंका काढून टाकाव्यात. त्याशिवाय पाऊल पुढे टाकू नका.
▪️मिथुन : घरात नवीन खरेदी केली जाईल. हातून काही कल्पक कार्य घडेल. कलेचे कौतुक केले जाईल. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळवाल.
▪️कर्क : योग्य वेळी बुद्धीचा वापर करावा. आजाराकडे दुर्लक्ष करू नका. मोठ्या अधिकार्‍यांचा हस्तक्षेप उपयोगी ठरेल. भावंडांचा सल्ला मोलाचा ठरेल.
▪️सिंह : कपटी लोक ओळखून वागा. विनाकारण खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या. दिवस व्यस्त राहील. नवीन जबाबदारी खांद्यावर पडू शकते.
▪️कन्या : विद्यार्थ्यांना परिश्रमाचा काळ. सोप्या वाटणार्‍या गोष्टी सहजपणे घेऊ नका. वादाचे प्रसंग टाळावेत. हितशत्रूंपासून सावध राहावे.
▪️तूळ : घरातील कार्य मार्गी लागतील. कामात एखाद्याचा हस्तक्षेप घ्यावा लागेल. व्यवहारासंबंधी मुद्दे मार्गी लावा. जुने वाद मिटू शकतील.
▪️वृश्चिक : पुढील पाऊल उचलताना तज्ञांचा सल्ला घ्यावा. सकारात्मक विचार करावा. मानसिक प्रसन्नता लाभेल. गुंतवणुकीसाठी योग्य काळ.
▪️धनु : कौटुंबिक समस्या धीराने सोडवा. विद्यार्थ्यांनी एकाग्रता ठेवावी. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. दैनंदिन कामात थोडा बदल करून पहावा.
▪️मकर : भागिदारीतून लाभ मिळेल. कामात अपेक्षित परिवर्तन दिसून येईल. वादाचे प्रसंग टाळावेत. जोडीदाराच्या खुशालीसाठी खर्च कराल.
▪️कुंभ : नवीन ओळख होईल. वडीलांचे मार्गदर्शन घ्यावे. कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. व्यापारी वर्गाला सुखद दिवस.
▪️मीन : आज व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. कामातील काही समस्या सुटतील. सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा. आपल्या बोलण्यात मृदुता ठेवा.
Leave A Reply

Your email address will not be published.