Take a fresh look at your lifestyle.

अद्भुत! ‘हा’ विशाल दगड दोन भागात कापला गेलाय !

मात्र आजपर्यंत झाला नाही कसलाच खुलासा.

 

आज आपण एक अशा ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याबद्दल तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
हे ठिकाण म्हणजे सौदी अरबमधील अल नसलाचा दगड. हा दगड पाहून सगळेच लोक हैराण होतात. कारण पृथ्वीवर इतक्या मोठ्या दगडाला कापणारी कोणतीही यंत्रणा नसताना दगडाला समान भागात कापण्यात आलंय.
याच कारणामुळे या दगडाला पाहून लोकांच्या मनात एलियन्सचा विचार येतो. अल नसला येथे एक मोठा डोंगर रूपी दगड आहे. ज्याला मधोमध दोन भागात कापण्यात आलंय. मात्र हा दगड कुणी, कसा कापला? याचा आजपर्यंत कसलाच खुलासा झालेला नाही.
य दगडाचे फोटो पाहून लोक म्हणतात की, हे काम केवळ एलियन्सच करू शकतात. कारण पृथ्वीवर असे करणे अशक्य आहे. तर काही एक्सपर्ट्स सांगतात की, या दगडाला अशाप्रकारे कापणं freeze-thaw weathering चा भाग असू शकतो.