Take a fresh look at your lifestyle.

तुमचे प्रेम फुलण्यासाठी ‘या’ गोष्टी टाळाच…

...तरच आयुष्यभर टिकेल नाते.

 

प्रेम म्हटले कि, अनवधानाने चुका या होणारच. मात्र संबंध दृढ करुन आयुष्यभर नाते टिकवण्यासाठी अनेक गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक बाब आहे. यासाठी पुढील काही सामान्य चुका नक्की टाळा…
▪️ तुलना करणे : काहींना इतरांबरोबर तुलना करण्याची वाईट सवय असते. यात वेळ घालण्यापेक्षा आपले संबंध घट्ट करण्याकडे वेळ दिला तर तुमचे नाते अजून खुलेल.

▪️ प्रोत्साहन न देणे : तुमच्या जोडीदाराला नवीन शिकण्यासाठी किंवा करण्यासाठी प्रोत्साहन देत आहात का? याची खात्री करा. असे प्रोत्साहन देण्यास कधीही विसरू नका. कारण तुमचे संबंध बळकट करण्यासाठीची ही गुरुकिल्लीच आहे.
▪️ गॅजेटमध्ये वेळ खर्च : हल्ली गॅजेटचा वापर करणे वाढतच चालला आहे. पण त्याचा तुमच्या जीवनावर विपरित परिणाम होता कामा नये, याची काळजी घ्या. कारण अनेकदा गॅजेटमुळे तुम्ही इतरांना जास्त वेळ देऊ शकत नाही. यामुळे नाते नक्कीच खराब होऊ शकते.

▪️ समस्यचे निराकरण करा : तुमची भांडणे लहान असो कि मोठी झोपण्यापूर्वी ती मिटवण्याचा अवश्य प्रयत्न करा. आपल्या साथीदाराबरोबर बोला आणि एकत्र येऊन त्याचे निराकारण करा. अशाने नक्कीच फायदा होईल.
वरील सोप्या टिपांचे अनुसरण केले तर तुमचे एकमेकांवरचे प्रेम अजून वाढेल यात शंका नाही.