Take a fresh look at your lifestyle.

“मला आठवलेय महायुतीचे गाणे” !

0
सिंधुदुर्ग : कोकणातील चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात आज (शनिवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे एकत्र आले होते. यावरुन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या छोटेखानी भाषणात नेहमीच्या शैलीत चारोळी सादर केली.
‘याठिकाणी एकत्र आलेत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे, मला आठवलेय महायुतीचे गाणे’, अशी चारोळी रामदास आठवले यांनी यावेळी म्हटली. रामदास आठवलेंनी म्हटलेली ही चारोळी चर्चेचा विषय ठरली. या चारोळीच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजपची पुन्हा युती व्हावी, अशी इच्छा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली.
दरम्यान, शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती होती तेंव्हा मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलेले आहे, असे सांगत रामदास आठवले यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
Leave A Reply

Your email address will not be published.