Take a fresh look at your lifestyle.

पाडळीच्या शिवसेनेच्या उपसरपंचांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

पारनेर : नगर -पारनेर विधानसभा मतदार संघातील अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला असताना आज पाडळी तर्फे कान्हूर गावचे शिवसेनेचे विद्यमान उपसरपंच नितीन शंकरराव दावभट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
आमदार निलेश लंके यांनी यावेळी दावभट यांचे पक्षात स्वागत केले.पाडळी गावचे सेवा संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब सिनारे आणि निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते राजू दावभट,राहुल दावभट
यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. त्यांच्या भावी वाटचालीस आ. लंके यांनी शुभेच्छा दिल्या.