Take a fresh look at your lifestyle.

पठ्ठयाने ५० हजारात घरी आणली फॉर्च्यूनर पण…

पुणे : अलिशान अशा महागड्या गाडीत बसून फिरावं,इतरांसारखीच आपल्याकडेही मोठ्या ब्रॅण्डची गाडी असावी असे अनेक जणांचे स्वप्न असतं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक काय करतील याचा भरवसाच नाही. असाच प्रकार पुणे जिल्हयातील पाटस तालुक्यात घडला आता हे प्रकरण थेट पोलीसात गेले आहे.
एका बडया शेतकऱ्याने मोठ्या हौसेने अलिशान फॉर्च्युनर गाडी घेतली, पण काही कारणांनी त्याने ती विकण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मग एकाने ही अलिशान गाडी आपण १२ लाखाला घेऊ असे सांगितले. त्याने त्यांना २ लाख रुपये रोख देण्याचे ठरवले, पण यानंतरही त्यांनी फक्त ५० हजार रुपये दिले. वरचे दीड लाख आणि पुढील १० लाख कर्ज हफ्त्यात देतो असे सांगितले. शेतकऱ्याला विश्वासात घेऊन हा पठ्ठया अवघ्या ५० हजार रुपयात गाडी घरी घेऊन गेला.
आता ५० हजार रुपयात जो व्यक्ती फॉर्च्यूनर घरी घेऊन गेला आहे, तो एकही हफ्ता भरायला तयार नाही. यामुळे शेतकऱ्यावरचा साडे अकरा लाखाचा बोजा तसाच राहिला.
या प्रकरणी पोलिसांनी आदेश सुरेश जाचक, राहणार देऊळगाव ताडा, दौड यांच्या तक्रारीवरुन संपत दत्तू खारतोडे, राहणार खारतोडे वस्ती, पाटस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। 

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421