Take a fresh look at your lifestyle.

वडगाव सावताळचा तलाव तुडुंब; ग्रामस्थांनी केले जलपूजन

 

टाकळी ढोकेश्वर : वडगाव सावताळ येथील तलाव चांगल्या पावसामुळे तुडुंब भरला आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून वडगाव सावताळ येथील ग्रामस्थांनी गावचे माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत यावेळी जलपूजन केले. 
दरम्यान वडगाव सावताळ येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे परिसरातील शेत जमिनीला या पाण्याचा फायदा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून शेती पिकासाठी आता पुढील काही दिवस मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न आता मिटला असून शेतकरी आनंदी झाला आहे.तलाव भरल्याने वडगाव सावताळ येथील ग्रामस्थांनी आनंद उत्सव साजरा करत जलपूजन केले. पाण्याच्या स्वागताला यावेळी गावातील अनेक युवक, ज्येष्ठ ग्रामस्थ तसेच शेतकरी मोठ्या संख्येने तलावाच्या ठिकाणी उपस्थित होते.
तलावांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून सांडव्यावाटे पाणी बाहेर पडत आहे. त्यामुळे वडगाव सावताळ येथील तलाव आता ओव्ह .रफ्लो झाला आहे.
यावेळी वडगाव सावताळचे माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे सरपंच बाबासाहेब उर्फ मिठु शिंदे, चेअरमन सर्जेराव रोकडे, ह.भ.प. गोरक्ष रोकडे, सखाराम भोबाळ, उपसरपंच रुपाली वाणी, अर्जून रोकडे, अनिल गायकवाड, किरण सरोदे, मंगेश रोकडे, गणेश खंडाळे, संदिप खंडाळे, कुमार भोबाळ, आदी वडगाव सावताळ येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना वडगाव सावताळ चे सरपंच बाबासाहेब उर्फ मिठू शिंदे म्हणाले की आमच्या वडगाव सावताळ येथील तलावाला पाणी आल्यामुळे शेत जमिनीला भविष्यात चांगले भरपूर प्रमाणात पाणी राहील त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.
टाकळी ढोकेश्वर, वासुंदे, वडगाव सावताळ या परिसरामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे वडगाव सावताळला वरदान असलेला तलाव हा पूर्ण क्षमतेने तुडुंब भरला आहे. त्यामुळे तलावाच्या ओलिताखाली असलेल्या शेत जमिनींना आता मोठ्या प्रमाणात पाणी मिळणार असून वडगाव सावताळ येथील शेतकरी यांनी जल्लोषात पाण्याचे स्वागत केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असून नक्कीच तलाव भरल्यामुळे वडगाव सावताळ परिसरात आनंदमय वातावरण तयार झाले आहे.
 भाऊसाहेब शिंदे
(माजी सरपंच वडगाव सावताळ)