Take a fresh look at your lifestyle.

”तुम्ही चोऱ्या केल्या नसत्या तर आम्ही धाडी टाकल्या असत्या का’ ?

देगलूर : ‘आम्ही धाडी टाकायाला लावल्या असे काँग्रेस ,राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. तुम्ही चोऱ्या केल्या नसत्या तर आम्ही धाडी टाकल्या असत्या का? असा सणसणीत सवाल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.
यावेळी देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार सुभाष साबणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकण्यात आले. तसेच जरंडेश्वर साखर कारखान्यावरही छापा टाकला. पार्थ पवार यांच्यासह अजित पवार यांच्याशी संबंधित लोकांच्या एकूण ४० रहिवाशांच्या आणि व्यावसायिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर देगलूर येथील प्रचारसभेत केंद्रीय राज्यमंत्री दानवे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,शिवसेना आणि भाजपची युती होती. हे सरकार बेईमानी करून आलेले आहे. पण शिवसेनेने काँग्रेस- राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. पण आमच्याकडे जास्त जागा आहे. तुमच्या दम असेल तर आमच्याशी एकटं एकटं येऊन लढा, असे खुले आव्हान देखील रावसाहेब दानवे यांनी दिले आहे. आता धाडी पडल्यात यात कोणाकोणाची नावं आहेत, हे तुम्हालाही माहिती आहे. धाडी पडल्यावर कसं थरथर घाबरायला होतं, असेही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.