Take a fresh look at your lifestyle.

प्लेऑफचे चार संघ ठरले! जाणून घ्या कोण कोणाशी भिडणार ?   

आयपीएलमधील प्ले ऑफचे चार संघ आता ठरले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानी यंदा प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. या प्लेऑफमध्ये कोण कोणाशी आणि कधी भिडणार? याबाबत जाणून घेऊयात…  
10 ऑक्टोबर रोजी दिल्ली आणि चेन्नईमध्ये पहिला क्लालिफायर सामना रंगेल. 11 ऑक्टोबर रोजी बंगळुरू आणि चौकोलकाता संघात एलिमेटर सामना खेळला जाईल. या एलिमेटर सामन्यातील विजेत्या संघाला पहिल्या क्वालिफायर लढतीतील पराभूत संघासोबत खेळावे लागणार आहे.
13 ऑक्टोबरला हा दुसरा क्वालिफायर सामना रंगेल. त्यानंतर या लढतीतील विजेता संघ फायनलमध्ये जाईल आणि क्वालिफायर एकमधील विजेत्या संघाशी त्यांचा सामना होईल. या सगळ्या लढाईनंतर 15 ऑक्टोबरला अंतिम सामना रंगणार आहे.
कोणाचे पारडे जड? पाहूयात!
दिल्ली आणि चेन्नई संघात 25 लढती झाल्या असून यात 10 वेळा दिल्ली तर 15 वेळा चेन्नईने बाजी मारली. एकाच सिझनमध्ये चेन्नईला दोनदा पराभूत करणारा पहिला संघ होण्याचा मानही दिल्लीने मिळवला असल्याने यंदा दिल्लीचे पारडे जड मानले जात आहे.
दुसरीकडे बंगळुरू आणि कोलकाताचा संघ आयपीएलमध्ये 28 वेळा आमने-सामने आला आहे. यात केकेआरने 15 विजय, तर 13 लढतीत पराभव स्वीकारला आहे. यंदा झालेल्या दोन्ही लढती विराट कोहलीच्या बंगळुरूने जिंकल्या आहेत.