Take a fresh look at your lifestyle.

‘राष्ट्रवादी’च्या वक्ता प्रशिक्षण सेलच्या तालुकाध्यक्षपदी सतीश कोळपे !

रुपालीताई चाकणकरांच्या हस्ते निवडीचे पत्र.

 

✒️ सतीश डोंगरे 
शिरूर : शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वक्ता प्रशिक्षण सेलच्या अध्यक्षपदी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतिश कोळपे सर यांची निवड करण्यात आली आहे.
खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पुण्यात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची फ्रंटल सेल आढावा बैठक पार पडली. या बैठकीत श्री. कोळपे यांना निवडीचं पत्र, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर, पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित दादा शिवतारे, पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय कोलते, महिला अध्यक्षा भारती शेवाळे, युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, युवती अध्यक्षा पूजा बुट्टे, राष्ट्रवादीचे शिरूर तालुकाध्यक्ष रविबापू काळे, हवेली तालुकाध्यक्ष दिलीपनाना वाल्हेकर, रविंद्र फडतरे, सुभाष भैरट तसेच सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

या निवडीनंतर शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी श्री. कोळपे यांचे अभिनंदन केले. “पक्षासाठी तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने संधी मिळाली.” अशी प्रतिक्रिया आमदार पवार यांनी व्यक्त केली.
“पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी माझे काम अविरत चालू आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून अजून जोमाने काम करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार. पक्षाने टाकलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही”, अशी प्रतिक्रिया श्री. कोळपे यांनी या निवडीनंतर व्यक्त केली. तसेच यापुढील काळात सर्वांना बरोबर घेऊन काम करू, सर्व पक्ष कार्यकर्ते व नेते यांचे सहकार्य राहील असा मला विश्वास आहे, असे श्री. कोळपे यांनी सांगितले.