Take a fresh look at your lifestyle.

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते आ.निलेश लंके यांचा सन्मान !

महाराष्ट्र कोरोना योध्दा पुरस्कार प्रदान.

पारनेर : कोरोना संकच्या काळात जीवाची पर्वा न करता अविश्रांत परीश्रम घेऊन दोन्ही लाटांमध्ये तब्बल तिस हजारांवर रूग्णांना बरे करून घरी सोडणाऱ्या आ. निलेश लंके यांच्या कार्याची ख्याती सातासमुद्रापार पोहोचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही त्यांच्या या कामाचा नेहमीच गौरव केला जातो. कोरोनाची सर्वत्र भिती बाळगली जात असताना आ. लंके यांनी थेट रूग्णांमध्ये जाऊन त्यांना धीर देण्याचे काम केल्यामुळे त्यांच्या नावाभोवती जगभरात वेगळेच वलय निर्माण झालेले आहे. त्याचीच दखल घेत दिपाली सय्यद चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आ. लंके यांना महाराष्ट्र करोना योध्दा पुररस्कार देउन सन्मान करण्यात आला. 
सर्वत्र कोरोनाची पहिली लाट सुरू झाल्यानंतर आ. लंके यांनी शरदचंद्र पवार आरोग्य मंदीर या नावाने कर्जुले हर्या येथे कोव्हिड सेंटर सुरू केले. तेथे रूग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. दुसऱ्या लाटेचे मोठे संकट प्रशानापुढे असताना जिल्हयात सर्वप्रथम आ. लंके यांनी भाळवणी येथे पवारांच्याच नावाने दुसरे कोव्हिड सेंटर सुरू केले. तेथे शंभर रूग्णांसाठी ऑक्सिजन बेडचीही सुविधा देण्यात आली.
लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या या कोव्हिड सेंटरमध्ये मतदारसंघातीलच नव्हे तर राज्याच्या विविध भागांतील रूग्णांनी उपचार घेतले. विशेष म्हणजे या कोव्हिड सेंटरमध्ये एकाही रूग्णाचा बळी गेला नाही हे देखील विशेष !
घाबरण्यामुळेच कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आ. लंके यांनी प्रत्येक रूग्णाची दररोज भेट घेऊन त्याला धीर देण्याची कटाक्षाने काळजी घेतली. घरातील माणूस जवळ येत नसताना आ. लंके मात्र दिवसातून दोनदा भेट घेत धिर देत असल्याने रूग्णांच्या मनातील भिती दुर झाली. त्यांच्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आल्याने रूग्णांसाठी तेथे आनंदी वातारण तयार झाले. राज्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळींनी या कोव्हिड सेंटरला भेट देत तेथील व्यवस्थेची पाहणी केली. देश परदेशातून या सेंटरसाठी लाखो रूपयांच्या देणग्याही देण्यात आल्या. याच सर्व गोष्टींचा विचार करून आ. लंके यांना महाराष्ट्र कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
कोरोना काळातील कामगिरीबद्दल आ. लंके यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांच्या बैठकीत खुद्द शरद पवार यांनी लंके यांना करोना काळात केलेल्या कामाची माहिती देण्याची सूचना केली होती. आ. लंके यांच्या कामावर खुश होऊन पवार यांनी अलीकडेच त्यांच्या हंगे येथील घरीही भेट दिली होती.
५१ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मिळालेल्या रकमेचा धनादेश आ. लंके यांनी सय्यद ट्रस्टला परत करून त्यांच्या सामाजिक कार्याला पाठबळ दिले.