Take a fresh look at your lifestyle.

अध्यात्मिकता रुचत नाही आणि रुजतही नाही.

का बर असं होत असावं ?

 

अध्यात्मिक असण्या नसण्यानं असा काय फरक पडतो?असा प्रश्न अनेकांना पडत असेल.काल एक बातमी वाचनात आली,

भावा बहिणीचं पुस्तकांवरुन भांडण झालं आणि आठवीत शिकणाऱ्या बहिणीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.आपण यावर काहीच विचार करणार नाही का? ही घटना आपल्या घरात घडली नाही म्हणून समाधानी आहात का,आपल्या घरात असं काही घडणारच नाही म्हणून निवांत आहात?आपल्यावर वेळ आल्यानंतर विचार सुरू होणं म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असच असेल ते.

तरुणांमध्ये सहनशीलता, क्षमाभाव तयारच होत नाही असं काहीसं चित्र आहे. अध्यात्मिक जीवन जगणाऱ्या परिवारांमधे अजुनही परिस्थिती समाधानकारक आहे. अध्यात्माकडे वळणारांना देव भेटला का?असा खवचटपणे प्रश्न विचारणारांची संख्या मोठी आहे.कदाचित त्यातच आपणही असु.अध्यात्म देव पहाण्यासाठी नाही तर देव होण्याची प्रक्रिया आहे. अवघडात पडण्याची गरज नाही.या अनमोल देहाचं महत्त्व ज्यांना कळतं ते दुसऱ्याला त्रास न देता आनंदाने जगु इच्छितात आणि आनंदाने जगु इच्छिणारांना अध्यात्मिक जीवन अपरिहार्य आहे. आपापल्या परिने अध्यात्माच्या व्याख्या तयार केल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे हे अगदी खरे आहे.खरे आध्यात्म समजून घेतले तर सुज्ञ,उच्चशिक्षित त्याचा सहज स्विकार करतील.

एक गोष्ट सतत लक्षात ठेवली पाहिजे, तुमचा प्रपंच सुखाचा नसेल,पती,पत्नी,आईवडील, मुलं यांच्याच तुमचा मेळ नसेल,एकवाक्यता नसेल तर तुम्ही प्रपंचात फेल आहात.नापास झाला आहात.बाहेरची तोतागिरी स्वतःचीच फसवणूक आहे. अध्यात्म या साऱ्याची जाणीव करुन देते.खरं काय आहे हे तुमच्या पुढ्यात ठेवतं.

आईवडिलांचंही बोलणं सहन न कळणाऱ्या मुलांना अध्यात्माची गरज आहे. पण तुम्ही अध्यात्माच्या बाहेर राहुन मुलांकडून ही अपेक्षा कशी करता येईल? भविष्यात मुलांच्या आत्महत्येचे आकडे वाढले तर नवल वाटायला नको.पालकांनो याचा गांभीर्याने विचार करा.

रामकृष्णहरी