Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 9 ऑक्टोबर 2021  

0

 

▪️मेष : आजच्या दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने होईल. धनलाभाचे योग जुळून येतील. आपल्या स्मरणशक्तीचा फायदा होईल.

▪️वृषभ : स्वत:ला कामात गुंतवून घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा. मित्रांची बाजू जाणून घ्या. काही नवीन शिकण्याचा योग येईल.

▪️मिथुन : महत्त्वाच्या कामाची अंमलबजावणी कराल. आर्थिक व्यवहारांकडे दुर्लक्ष नको. दिवस समाधानात जाईल.

▪️कर्क : घरातील वातावरण खेळकर राहील. नातेवाईकांची गाठ पडेल. व्यापार्‍यांची जुनी कामे मार्गी लागतील.

▪️सिंह : प्रेमातील व्यक्तींना शुभ दिवस. जवळच्या ठिकाणी फिरायला जाल. सल्ला मागणार्‍यांना योग्य मार्गदर्शन करा.

▪️कन्या : चर्चेतून मार्ग काढता येईल. जोडीदाराची बाजू जाणून घ्या. घरगुती गप्पांमध्ये गुंग व्हाल. उत्तम निद्रा सौख्य लाभेल.

▪️तूळ : सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. सर्वांशी गोडीने बोलाल. झोपेची तक्रार राहील. दिवसभर कामात अडकून राहाल.

▪️वृश्चिक : आजचा दिवस संमिश्र जाईल. रागाला आवर घालावी. मन विचलीत करणार्‍या घटना घडू शकतात. फसवणुकीपासून सावध राहावे.

▪️धनु : इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मनातील इच्छा पूर्ण होईल. तरुण वर्गाकडून काही शिकायला मिळेल.

▪️मकर : धार्मिक ग्रंथांचे वाचन करा. व्यापारीवर्ग खुश राहील. कमिशन मधून लाभ कमवाल. बाहेर फिरताना सतर्क राहावे.

▪️कुंभ : अनावश्यक खर्च टाळावा. बोलताना भान राखावे. संमिश्र घटनांचा दिवस. नवीन कामासाठी संकल्प करावा.

▪️मीन : अनावश्यक खर्च टाळावा. कौटुंबिक अडचणींकडे लक्ष द्या. रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील.

Leave A Reply

Your email address will not be published.