Take a fresh look at your lifestyle.

मांडओहोळ धरणामुळेच शेतकर्‍यांमध्ये सुबत्ता निर्माण झाली !

जि.प.सभापती काशिनाथ दाते यांच्या हस्ते जलपूजन संपन्न.

पारनेर : तालुक्यातील प्रत्येक दुष्काळी परिस्थितीत मांडओहोळ धरणाने तालुक्यातील जवळपास सर्वच गावांना पाणीपुरवठा केल्याने हे धरण तालुक्याची जीवनदायिनी असून या धरणामुळेच परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आर्थिक सुबत्ता निर्माण झाल्याचे मत जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुक्याची जीवनदायिनी समजले जाणारे मांडओहोळ धरण काल (गुरुवारी) पुर्ण क्षमतेने भरल्याने नगर जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांच्या हस्ते आज जलपूजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, बाजार समितीचे संचालक शिवाजी बेलकर,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले व परिसरातील कार्यकर्ते व लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभापती दाते पुढे म्हणाले की, मांडओहोळ धरण हे जवळपास दरवर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले जाते परंतु या वर्षी ते ऑक्टोबर महिन्यात भरले असले तरीही शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. या धरणातून परिसरातील सुमारे सव्वीसशे,सत्ताविसशे हेक्टर क्षेत्राला लाभ मिळतो. यामुळेच या परिसरात मोठ्या प्रमाणात तरकारीचे उत्पादन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आर्थिक सुबत्ता निर्माण झाल्याचेही दाते यांनी सांगितले.
यावेळी कर्जुले हर्याच्या सरपंच सौ संजीवनी आंधळे, माजी सरपंच साहेबराव वाफारे,पोखरीचे सरपंच सतीश पवार, वारणवाडीचे सरपंच संतोष मोरे, सावरगावचे सरपंच देवराम मगर, खडकवाडी येथील विकास रोकडे, दीपक उंडे, गण प्रमुख अक्षय गोरडे, शिवसेना तालुका महिला आघाडी प्रमुख सुनिता मुळे, पोखरीचे उपसरपंच परसराम शेलार, कारेगावचे सरपंच बापूराव ठुबे, उपसरपंच जानकू दुधवडे, अशोक पंडित, विष्णु शिंदे, संतोष आंधळे, विठ्ठल शिंदे, गणेश चौधरी, खंडू गुंजाळ, संकेत झावरे, विनायक घुले, भोमा शिंदे, नवनाथ पानमंद, शुभम टेकुडे, शुभम पवार, महिला आघाडी प्रमुख संगीता उंडे, दुर्गा आंधळे, पै.संतोष गाढवे प्रकाश गाडगे,मंगेश टेकुडे, संदिप आंधळे, महादु उंडे व परिसरातील शिवसेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.