Take a fresh look at your lifestyle.

… तर तहसीलदारांच्या दालनात आंदोलनाचा ‘मनसे’चा इशारा !

निराधार योजनेचे अनुदान रखडले.

 

पारनेर : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणारे अनुदान अनेक महिन्यापासून वेळवर मिळत नसल्याने वृद्धांना व अपंगांना बँकेत नाहक हेलपाटे मारावे लागत आहे. तसेच दर महा औषधासाठी तसेच उपजीविका भागविण्यासाठी पैसे नसल्याने मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे चौकशी करून संजय गांधी योजनेचे मानधन जमा करण्यात यावे, सदरचे मानधन हे १५ दिवसाच्या आत जमा न झाल्यास नाईलाजास्तव वृद्ध, अपंग यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना तहसील कार्यालय येथे तहसीलदारांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आता दरवर्षी उत्पन्नाचे दाखले देणे आवश्यक आहे.तहसीलदारांनी तशा प्रकारच्या आदेशाचे पत्र तालुक्यातील तलाठ्यांना काढून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अहवाल तहसील कार्यालयात प्राप्तच झाले नसल्याने जुलै महिन्यापासूनचे मानधन रखडले आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, शहराध्यक्ष वसिम राजे, युवराज नरसाळे, शैलेश सोनवणे, नवनाथ नरसाळे ,प्रशांत गाडेकर ,राहुल औटी, महेश चेडे, सनी थोरात, संदीप औटी, आदी उपस्थित होते,