Take a fresh look at your lifestyle.

बॅंकेच्या शिक्षणासाठी ग्रामीण तरूणांना मिळणार विनामूल्य प्रशिक्षण !

'जीएस' महानगर बॅंकेचे अध्यक्ष अॅड.उदय शेळके यांची माहिती.

पारनेर : ग्रामीण भागातील तरुणांना राष्ट्रीयीकृत बँकेच्या परीक्षांच्या तयारीसाठी पुणे- मुंबईत शिकवणीवर्गात जावे लागते. त्याकरिता मोठा खर्च येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना या परीक्षांच्या तयारीसाठी सॉलिसिटर गुलाबराव शेळके महानगर बँक सदस्य समाजसेवा संस्थेमार्फत दर्जेदार शिक्षकांमार्फत मोफत प्रशिक्षण देणार असल्याची माहिती ‘जीएस’ महानगर बँकेचे अध्यक्ष अॅड. उदय शेळके यांनी दिली.
यासंदर्भात माहिती देताना श्री. शेळके म्हणाले की, ग्रामीण मुलांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे. तालुक्यातील अनेक तरुण यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन सरकारी सेवेत उच्चपदांवर काम करीत आहेत. राष्ट्रीयीकृत बँकेतही दरवर्षी मोठ्या संख्येत भरती निघते.मात्र, मुलांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळत नाही. या सर्व बाबींचा विचारकेला असता, तालुक्यातील ज्या
मुला-मुलींना या परीक्षांचा अभ्यास व प्रशिक्षण घ्यावयाचे आहे, त्यांना सॉलिसिटर गुलाबराव शेळके महानगर
बँक सदस्य समाजसेवा संस्थेमार्फत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
त्याकरिता अद्ययावत प्रशिक्षण केंद्र,शिक्षक, ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहे. ज्यांना यात
सहभाग घ्यायचा आहे, त्यांनी पदवी प्रमाणपत्र किंवा तिसऱ्या वर्षाची गुणपत्रिका, पॅन कार्ड, आधार कार्ड, ई-मेल व मोबाईल क्रमांकासह अर्ज महानगर बँकेच्या पारनेर शाखेत जमा
करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.