Take a fresh look at your lifestyle.

भंडाऱ्याची उधळण करीत कारेगावात निघाली जिवाशिवाची मिरवणूक !

शिरूर तालुक्यात भाद्रपद बैलपोळा उत्साहात !

 

 

शिरूर : कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा…यांत्रिकरणाच्या युगात शेतीतला बैलांचा सहभाग कमी झालाय…तरीही बळीराजाच्या जीवनात त्यांचं स्थान कायम आहे… शेतकऱ्याच्या जोडीनं शेतात राबणाऱ्या या सच्चा मित्राचं गोड कौतुक करण्यासाठीच हा भाद्रपदी पोळ्याचा सण शिरूर तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
पोळ्याचे दोन दिवस बैलांसाठी विश्रांतीचे असतात.त्यांना न्हाऊ खाऊ घालून त्यांची रंगरंगोटी केली जाते. पुरणपोळीसारखा गोडधोड जेवणाचा नेवैद्य त्यांना दिला जातो. त्यानंतर वाजत-गाजत काही ठराविक बैलांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. तर अनेकांनी घरीच बैलपूजा केली.
यांत्रिकीकरणामुळे शेतीमधील बैलांचे महत्व कमी झालंय. तरीही अनेक शेतकऱ्यांना मशागतीसाठी आजही बैलांवरच अवलंबून राहवं लागतं. उन्हातान्हाची पर्वा न करता शेतात राबणाऱ्या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे पोळा. शिरूर तालुक्यात बैलपोळा सण कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. गर्दी होणार नाही यासाठी काही ठराविक बैलांचीच पूजा मान्यवरांनी केली. तर अनेकांनी आपल्याला घरीच बैलांची पूजा करून बैलपोळा सण साजरा केला.
प्रसिद्ध गाडामालक प्रकाश माणिक गवारे यांनी आपल्या बैलगाड्यांच्या बैलांसह वाजत गाजत कारेगाव येथ भंडाऱ्याची उधळण करीत जिवाशिवाच्या जोडीची भव्य मिरवणूक काढून बैल पोळा साजरा केला. या वेळी बैलांची पुजा करून त्यांना गोडधोड खाऊ घालण्यात आले. प्रकाश गवारे यांनी पत्नी सरस्वती यांच्यासह बैलांचे दर्शन घेतले. यावेळी पूजेला त्यांच्या सोबत त्यांचे चिरंजीव विजय व निलेश तसेच पुतणे तेजस व शुभम आणिबंधू बंडूशेठ गवारे, पोपट गवारे हे ही हजर होते.