Take a fresh look at your lifestyle.

नवरात्रीत उपवास करा, पण…

'ही' माहिती जाणून घ्याच.

पारनेर : नवरात्रीत नऊ दिवस उपवास करण्याऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या काळात दिवसा उष्मा व रात्री गारवा असल्याने हे हवामान जीवाणू व विषाणूंच्या वाढीस प्रचंड पोषक असते. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. उपवासामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात. सात्विक अन्न घेतल्याने शरीर शुद्ध होते व मनाला तरतरी येते. पण, वजन कमी करण्यासाठी उपवास करणे अजिबात हितावह नाही. उपाशी राहिल्याने वजन कमी होत नाही. उलट, उपवासानंतर तुम्ही नेहमीचा आहार घेणे सुरू करता; परंतु, उपवासामुळे तुमच्या शरीराची चयापचय शक्ती प्रचंड मंदावली असल्याने, शारीरिक हालचालींचा अभाव असल्याने तुमचे वजन वेगाने वाढते हे लक्षात ठेवले पाहिजे.
याचा अर्थ भाविकांनी उपवास करू नये असाही होत नाही. आपल्या रुढी, परंपरा तर पाळल्याच पाहिजेत. वास्तविक उपवासामुळे शरीरातील हानीकारक द्रव्ये बाहेर टाकली जाऊन प्रसन्न वाटते. भारतातील अनेक धर्म व परंपरांमागे वैज्ञानिक कारणेही दडलेली आहेत. त्यामुळेच आपण या काळात पचण्यास जड खाद्यपदार्थ, मांसाहार मद्यपान करणे टाळतो. पण, उपवासाच्या काळात अनेकजण पिष्टमय पदार्थ आवडीने खातात. त्यात अनेकदा फायबर नसतात. उपवासाचे अनेक पदार्थ तुपात शिजवले जातात ते पचायला अतिशय जड असतात. त्यामुळे अॅसिटीडीची आणि नंतर पचनाची समस्या निर्माण होण्याची भीती असते.
▪️ ‘हे’ आहेत उपवासाचे फायदे.
● उपवासात ताजे आणि ऋतूला धरून पदार्थ खाल्ले जातात. यामुळे शरीरातील विषद्रव्यं बाहेर टाकली जातात.
● उपवास करताना पचनास हलक्या पदार्थांचा समावेश केल्याने पचनक्रिया सुधारते.
● आहारातील पदार्थांची निवड योग्य पद्धतीने केली तर अ‍ॅसिडिटी किंवा अपचन दूर होते.
● उपवासात कमी तसेच सात्विक खाण्याकडे कल असल्याने जास्तीचे वजन सहज कमी होते.
● सात्विक आहारामुळे आपले शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न होते. तसेच शरीरात ऊर्जा टिकून राहते.