Take a fresh look at your lifestyle.

… अन् भल्या सकाळीच अजित पवार धरणाच्या पाण्यात मधोमध अडकले !

तराफ्याचे इंजिन बंद पडले आणि पुढे असे घडले

0

 

पुणे : जिल्ह्यातील कासारसाई धरणाच्या पाण्यात मधोमध पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज भल्या सकाळीच अडकले होते. तराफ्यावर बसून मत्स्य व्यवसायाची पाहणी करायला गेले असताना तराफ्याचे इंजिन अचानक बंद पडले. अखेर दुसऱ्या बोटीत रवानगी केल्यानंतर त्यांची सुटका झाली.
▪️’असा’ घडला हा प्रकार !
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कासारसाई धरणावर गेले होते. तराफ्यावर बसून मत्स्य व्यवसायाची पाहणी करत होते. यावेळी अचानक तराफ्याचं इंजिन बंद पडले. चालकाने इंजिन सुरु करण्याचे प्रयत्न केले, पण ते सुरु होईना. शेवटी जवळच असलेली बोट बोलावण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार दुसऱ्या बोटीत बसले आणि पुढचा प्रवास सुरु झाला.
पुण्याच्या मावळ तालुक्यात कासारसाई धरण आहे. तिथे बऱ्यापैकी मत्स्यव्यवसाय सुरू आहे. त्याचीच माहिती घेण्यासाठी पालकमंत्री अजित पवार सकाळी सात वाजताच पोहोचले होते. धरणाच्या मध्यभागी पिंजरा लावण्यात आलेला होता. तिथे जाण्यासाठी तराफा अथवा बोटीच्या साह्याने जायचे होते. संबंधित मालकांनी पवार यांना तराफ्यावर घेऊन जाण्याचे नियोजन आखले होते. गाडीतून अजित पवार उतरताच त्यांना याची कल्पनाही देण्यात आली.
तेव्हाच गरजेपेक्षा जास्तीचे लोक त्यावर घेऊ नका, अशी सूचना त्यांनी केली होती. मात्र तरीही उपस्थितांनी तराफ्यावर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी केली आणि तराफ्यावरचे वजन जास्त झाल्याने इंजिनवर ताण आला. त्यामुळे इंजिन बंद पडून तराफा मध्येच अडकला होता. पाहणी झाल्यानंतर जेव्हा ते परतले, तेव्हा त्यांनी घडल्या प्रकारावर मिश्किल टिप्पणीही केली. इथलं पर्यटन म्हणजे भलतीच कसरत आहे, असे अजित पवार म्हणाले.
Leave A Reply

Your email address will not be published.