Take a fresh look at your lifestyle.

पुणे हादरले ! मालक लघवीला जाताच ड्रायव्हरने केला ‘भलताच’ प्रताप !

परत येवून पहातो तर काय...

 

पुणे :शहरातील हडपसर परिसरात एक विचित्र पण धक्कादायक प्रकार समोर आहे. येथील एका व्यावसायिकाला लघवीला जावून येईपर्यंत ड्रायव्हरने तब्बल 97 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. मालक गाडीतून लघूशंकेसाठी उतरल्यानंतर, गाडीत ठेवलेले 97 लाख रुपये घेऊन चालक पसार झाला.संबंधित घटना पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
या घटनेतील फरार चालकाचे नाव विजय हुलगुंडे असे असून तो कोंढवा परिसरातील रहिवासी आहे. याबाबत 50 वर्षीय ड्रायफ्रूट्स व्यावसायिकाने हडपसर पोलिसांत चालकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
फरार आरोपी हुलगुंडे हा मागील आठ महिन्यांपासून फिर्यादी व्यावसायिकाकडे चालक म्हणून काम करत होता. दरम्यान आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन देखील केला होता. पण मालक लघवी करण्यासाठी गाडीतून उतरल्यानंतर तो 97 लाख रुपयांची रक्कम घेवून पसार झाला.चालकानेच व्यावसायिक मालकाला गंडा घातल्याच्या प्रकाराची पोलीस चौकशी करीत आहेत.