Take a fresh look at your lifestyle.

अखेर मनोहर मामाचा जामीन सत्र न्यायालयाकडून मंजूर !

गंभीर गुन्हयात झाली होती अटक.

बारामती : संत बाळूमामांचा अवतार असल्याचे भासवत भक्तांची आर्थिक लैंगिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली काही दिवसांपासून अटक असलेल्या मनोहर भोसले उर्फ मनोहर मामाचा जामीन अखेर सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. मनोहर मामावर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
बारामती आणि करमाळा या दोन ठिकाणी मामावर गुन्हे दाखल करण्यात आले होते, याच पार्श्वभूमीवर बारामती सत्र न्यायालयात सरकारी पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यावर मनोहर मामाला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
यासोबत मनोहर मामाचा सहकारी ओंकार शिंदे याला देखील जामीन मंजूर झाला आहे, बारामतीचे न्यायालयाचे सत्र सरन्यायाधीश एस टी भालेराव यांच्यासमोर ही सुनावणी करण्यात आली होती.
▪️असे आहेत आरोप !
बारामतीच्या गोजुबावी येथे राहणारे शशिकांत खरात यांच्या वडिलांना थायरॉईड आणि कॅन्सर झाला होता. ते त्यांच्या वडिलांना उंदरगावला मनोहर मामा यांच्याकडे घेऊन गेले होते. तेथे त्यांनी बाभळीचा पाला, भंडारा आणि साखर खायला देत वेळोवेळी पैसे घेतले होते.

शशिकांत खरात यांनी मनोहर मामा आणि त्याच्या साथीदारांना दोन लाख 51 हजार 500 रुपयांची रक्कम दिली होती.
तर एक महिला भक्ताकडून लैगिंक शोषणाचा देखील आरोप करण्यात आला होता.